vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ..

अमरावतीच्या राज्य सेवाहक्क आयुक्तपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती मंगळवारी मुंबई येथे पद व गोपनीयतेची शपथ..

अमराती प्रतिनिधी: राज्य सेवाहक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून म्हाडाचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी तथा वरिष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून राज्यपालांच्या वतीने आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव मंगळवार दिनांक 12 मे रोजी राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

मुंबई येथील म्हाडाच्या बिल्डिंग रिपेअर अँड री कन्स्ट्रक्शन बोर्डाचे मुख्य अधिकारी म्हणून अरुण डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. शासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या सामाजिक बांधीलकीने त्यांनी काम केले असून, शासकीय सेवेची सुरुवात उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर येथून झाली आहे. अमरावती विभागात मूर्तिजापूर, दारव्हा, अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदावरही काम केले आहे.

 अमरावती महापालिका आयुक्त म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच ऑनलाइन इमारत परवाना पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घर बांधणीसाठी सुलभपणे परवानगी मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते अभिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. यशवंत पंचायतराज अभियानातही त्यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी या पदावर काम करताना जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली.

या योजनेचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्याधिकारी तसेच शासनाच्या विविध विभागात त्यांनी यशस्वीपणे सेवा दिली आहे. मुंबई येथील म्हाडामध्ये मुख्याधिकारी असताना इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचा हक्क अबाधित राहावा, त्यांना वेळेत भाडे मिळावे व इमारतीचे नियोजित वेळेत बांधकाम करून पुनर्वसन करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यांच्या कार्यकाळात निर्गमित करण्यात आला. त्यांच्या प्रभावी व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची अमरावतीचे राज्य सेवाहक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

0000

संबंधित पोस्ट

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष

vishwatmaklokswamivarta

धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· स्थानिक कारागिरांच्या पुर्नवसनाला सर्वोच्च प्राधान्य· धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजूरी..

धारावी विभागात भाजपा आणि चेंजर बॉईज कबड्डी टीम* यांच्या वतीने दोन दिवसीय *भव्य कबड्डी स्पर्धा* चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ८ वर्षे मुदतीचे१००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा आश्वासनांचा अवमान थांबवा : अधिकाऱ्यांच्या मुजोरीवर आ. सुधीर मुनगंटीवार आक्रमक- लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान सहन केला जाणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार यांची परखड भूमिका