vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी मुंबई व सातारा भरारी पथकाची १ कोटी ८६ लाखांची मोठी संयुक्त कारवाई

सातारा प्रतिनिधी :- गोवा राज्यातील विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा प्रचंड साठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) आणि भरारी पथक (सातारा) यांनी सातारा-लोणंद रोडवर संयुक्त सापळा रचून तब्बल १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 सातारा-लोणंद रोडवरील तडवळे (स. वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील ‘हॉटेल रंगिला राजस्थान’ समोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवली होती. यावेळी संशयास्पद वाटलेल्या एका टाटा कंपनीच्या १० चाकी ट्रक कंटेनरची (क्र. NL-01-AF-3549) झडती घेतली असता, त्यात केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.

 याप्रकरणी दोघांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. क्र. ४२५/२०२६ (दि. १७/०६/२०२६) अन्वये नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये मोठी आंतरराज्यीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे आणि उप अधीक्षक (मुंबई भरारी पथक) रविंद्र उगले, निरीक्षक रियाज खान व निरीक्षक विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड करत असून अमोल चिलगर यांनी फिर्याद दिली आहे.

 मुंबई भरारी पथकात दुय्यम निरीक्षक संतोष गोंदकर, रुपेश चव्हाण आणि जवान अमोल चौगुले, चंदन पंडित, बाबू देवकर, महेश कोकणे, विजय ढवळे, ओंकार हराळे तर सातारा भरारी पथकात निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजय पाटील, जवान नरेंद्र कलकुटगी, शंकर चव्हाण, फलटण कार्यालयातील निरीक्षक संजय दिंडे, संदीप लोहकरे, जवान विनोद हिंगणे आणि प्रियांका माळवे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

 राज्य शासनाचा महसूल बुडवून होणारी अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतूक या संदर्भात काहीही माहिती अथवा तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक: १८०० ८३३ ३३३३, व्हॉटसॲप क्रमांक: ८४२२००११३३, दूरध्वनी क्रमांक: ०२२-२२६६३८८१ क्रमांकांवर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अन्न व औषध प्रशासनाकडून मे. डी. ॲण्ड जी फार्मा या औषधी पेढीची तपासणी

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नाही याची दखल घेऊन फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे नागरिकांना आवाहन*

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे निर्देश