vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

 

राज्य प्रतिनिधी-

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे:-“आनंद आणि उत्साहाचे पावन पर्व म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. यानिमित्त मी भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा देते आणि हार्दिक अभिनंदन करते.भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि शिकवण आपल्याला आत्म-विकास आणि आत्म-साक्षात्कारासाठी प्रेरित करते. भगवान श्रीकृष्णांनी धर्माच्या मार्गाचे अनुसरण करून मानव जातीला परम सत्य प्राप्तीबाबत प्रबोधन केले. हा उत्सव आपल्याला योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलेली शाश्वत मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा देतो.

याप्रसंगी आपण सर्वांनी भगवान श्रीकृष्णांच्या शिकवणींचे पालन करण्याची तसेच आपला समाज आणि राष्ट्र अधिक बळकट करण्याची प्रतिज्ञा करू या”.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

vishwatmaklokswamivarta

जागतिक युवा कौशल्य विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस — सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पळस्पे ते कशेडी बोगदा रस्त्याची केली पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कृती कार्यक्रमाची-अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..