vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच खडकपुर्णा प्रकल्पातूनही एक लाख क्युसेसपेक्षा अधिक जलविसर्ग करण्यात आलेला आहे. तरी या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील गोदावरी काठावरील तसेच पुर्णा नदीवरील पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानूसार वितरीत करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या आपेगाव, साष्ट पिंपळगाव, सुखापुरी, पिठोरी सिरसगाव, जोगलादेवी, वाणेगाव, आंतरवाली टेंभी या गावातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधा वस्तुंचे वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या नियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्याकडून करण्यात आली आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जालन्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई: परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम करणार्‍यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

विधानपरिषद लक्षवेधी :पवित्र पोर्टलमध्ये सुधारणा करणार- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर

तृतीयपंथीयांच्या हक्क व कल्याण योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

राज्यातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा..

शनिवारी पत्रकार दिनाचे आयोजन-विकासकुमार बागडी