vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

बालिकेची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस दलाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर 

बालिकेची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस दलाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहिर

जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यातील अंबड येथील फैसलाबाद कॉलनीमधील कु. इकरा अमजद शेख या मुलीला दि.12 जानेवारी 2025 रोजी अंदाजे दुपारी 3.30 वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवुन नेले आहे. त्यावेळी बालिकेचे वय 3 वर्ष 1 महिना असे होते. तरी या बालिकेविषयीची माहिती देणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस दलाकडून 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिस निरीक्षक अंजली राजपुत यांनी दिली आहे.

कु. इकरा नावाची बालिका हरवल्याची अमजद हाजी शेख यांनी फिर्याद दिल्यावरुन अंबड पोलिस ठाण्यात गु.र.प.22/2025 कलम 137(2) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेच्या दिवसापासून बालिका ही अद्यापपर्यंत आढळुन आलेली नाही. तरी सद्यस्थितीत या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), जालना यांच्याकडून करण्यात येत आहे. कु. इकरा हीचा शरीर बांधा सडपातळ असून उंची 2.5 फुट आहे. चेहरा गोल, रंग सावळा असून काळे कुरळे केस आहेत. तिला हिंदी भाषेतील काही शब्द बोलता येतात. अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक असून तिची मन:स्थिती चांगली आहे. तरी या वर्णनाची बालिका आढळुन आल्यास सीआयडीच्या पोलिस निरीक्षक अंजली राजपुत (मो.8625853786) यांच्याशी संपर्क साधावा. बालिका अथवा तिला पळविणाऱ्या इसमाविषयी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

अनधिकृत बालगृहावर महिला व बाल विकास विभागाची कारवाई; ९१ बालकांची सुटका

vishwatmaklokswamivarta

दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई,भेसळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होणार; जिल्हास्तरीय पथकाकडून तपासणी मोहीम

हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला ​​अटक; लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप..

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर  रुग्णालयातून डिस्चार्ज…

vishwatmaklokswamivarta

29 वर्षीय तरुणी राबोडी येथून बेपत्ता शोध घेण्याचे राबोडी पोलिसांचे आवाहन

ठाण्यातील आरएमसी ट्रकमधील लपलेल्या डब्यातून लाखो रुपयांची ” पुष्पा चित्रपटाची स्टाईल ” दारू जप्त.

vishwatmaklokswamivarta