vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

29 वर्षीय तरुणी राबोडी येथून बेपत्ता शोध घेण्याचे राबोडी पोलिसांचे आवाहन

29 वर्षीय तरुणी राबोडी येथून बेपत्ता शोध घेण्याचे राबोडी पोलिसांचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी:- राबोडी येथील क्रांतीनगर परिसरामध्ये राहणारी २९ वर्षीय रिजवान बानो वाहीद अली सलमानी ही तरुणी तिच्या घरातून अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात अधिकृत मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून संबंधित तरुणीचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.      मिळालेल्या माहितीनुसार, राबोडीतील गल्ली नंबर १४, क्रांतीनगर येथील रहिवासी असलेली रिजवान बानो ही तरुणी १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने नातेवाइकांनी तिचा शोध सुरू केला; मात्र तिची कोणतीही माहिती न मिळाल्याने अखेर कुटुंबाने राबोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेप्रकरणी १३ जुलै रोजी राबोडी पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर क्रमांक T३९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

            बेपत्ता तरुणीचे वर्णन करताना पोलिसांनी सांगितले की, २९ वर्षीय रिजवान बानो हिचा रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ आणि बांधा मध्यम आहे. तिचे डोक्याचे केस काळे असून थोडे लांब आहेत. घरून निघताना तिने अंगात काळ्या रंगाचा बुरखा आणि पायात पांढऱ्या रंगाची सॅन्डल परिधान केली होती. तिच्यासोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असून त्यात ६३८७०८६९६९ या क्रमांकाचे जिओ सिम कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे.

            या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर करत आहेत. सदर वर्णनाची तरुणी कोणाला दिसून आल्यास अथवा तिच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ राबोडी पोलीस ठाण्याशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे शहर पोलीस प्रशासनाने आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन जणाला अटक 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू

vishwatmaklokswamivarta

२४ तासांत खून उघडकीस; आरोपी पतीला अटक.

vishwatmaklokswamivarta

चेन्नई, तामिळनाडू येथून सायबर क्राइम चा आरोपीला  अटक: सायन पोलीस स्टेशन.एका महत्त्वपूर्ण यशामध्ये, सायबर पोलिस स्टेशनने ₹1,00,000 च्या आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्याचा उकल..

vishwatmaklokswamivarta

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….

२० हजार लिटर अवैध पेट्रोलियमसह टँकर जप्त, ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत,ठाण्यात भरारी पथक आणि पोलिसांची कारवाई