vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नाशिक मधून मोठी बातमी -,इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांवर हल्ला; त्या महिलेची छेडछाड,करून त्यांनी केला गाडीचा पाठलाग करणाऱ्या नऊ आरोपींना अटक

नाशिक मधून मोठी बातमी -,इगतपुरीतील भावली धबधब्यावर पर्यटकांवर हल्ला; त्या महिलेची छेडछाड,करून त्यांनी केला गाडीचा पाठलाग करणाऱ्या नऊ आरोपींना अटक

 नाशिक प्रतिनिधी –

नाशिक येथील एका परिवाराला नाशिक जवळ असलेल्या इगतपुरी येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना छेडछाड करून गाड्यांची तोडफोड करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नऊ आरोपींना इगतपुरी पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत

   पोलिसांनी दिलेली माहिती की, हे कुटुंब पर्यटनासाठी इगतपुरीला आले होते.भावली धबधब्याजवळ काही स्थानिकांनी त्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढल्याने वादाला सुरुवात झाली.जेव्हा तिच्या नातेवाईकांनी त्या गटाला जाब विचारला, तेव्हा त्यांच्यात बाचाबाची झाली.

   त्यानंतर त्या गटाने कुटुंबाच्या गाडीचा सुमारे १५-२० किमीपर्यंत पाठलाग केला.घोटी टोल प्लाझाजवळ त्यांनी गाडी अडवली आणि त्यातील प्रवाशांवर हल्ला केला. “तक्रारीनुसार,आरोपींनी गाडीचे नुकसान केले, कुटुंबातील सदस्यांना मारहाण ही केली,महिलेची छेड काढली आणि दागिने हिसकावून नेले,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

    इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे; यात मारहाण, विनयभंग, लूटमार आणि दंगल यांसारख्या आरोपांचा समावेश आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ९ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे.

संबंधित पोस्ट

बनावट भारतीय चलनी नोटा छापून त्यांचा पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश करत चार आरोपींना अटक 

केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (CBN) ‘ऑपरेशन ब्लॅक हॉक्स’ अंतर्गत आंतरराज्य हेरॉईन तस्कर टोळीचा पर्दाफाश केला, 18.6 किलो कच्चे हेरॉईन जप्त आंतरराज्य टोळीच्या 3 प्रमुख सदस्यांना अटक

एका परदेशी दूतावासाच्या बनावट नंबर प्लेट लावलेल्या गाडीतून दिल्लीत फिरत असलेल्या एका महिलेला अटक 

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई!

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी.