vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मुंबईतील मुलुंड रेल्वे स्टेशनवर गंभीर प्रकार

मुंबई प्रतिनिधी-मुंबई उपनगरातील मुलुंड रेल्वे स्टेशनवर आज धक्कादायक घटना घडली. पतीने रागाच्या भरात पत्नीला 13 वर्षाच्या मुलासमोर लोकल ट्रेनसमोर ढकलून दिले. त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पती मुलाला घेऊन घटनस्थळावरून पळून गेला. पण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाचा कसून शोध घेऊन त्याला गुजरातमधील सुरतमधून अटक केली आहे. मृत्यू महिलेचे नाव पुष्पा गुप्ता असून ती 36 वर्षांची होती.
मुलुंड स्टेशनवर नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार पती – पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होते. पत्नी आपल्या 13 वर्षांच्या मुलासह नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुलुंड रेल्वे स्टेशनवर आली होती. तिचा पाठलाग करत नवराही तिथे पोहोचला. मग मुलुंड रेल्वे स्टेशनवर पत्नीला गाठून त्याने वाद घ्यायला सुरुवात केली. पत्नीने जेव्हा घटस्फोटाची मागणी केली तेव्हा हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीला समोरून येणाऱ्या लोकलसमोर ढकलून दिलं. ज्या लोकल समोर ढकललं ती कल्याणकडे जात होती. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
त्या नराधम पतीचं नाव राजू गुप्ता असून त्याने आपल्याच 13 वर्षीय मुलासमोर पत्नीला लोकलसमोर ढकललं. राजू आणि पुष्पा मुलुंड पश्चिमेतील रामगड इथे राहत होते. त्यांना दोन मुलं आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरु होते. त्या दोघांमधील सततच्या भांडणामुळे तिने कंटाळून पोलिसांकडेही धाव घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वी म्हणजे 13 फेब्रुवारीला तिने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर ती मुलांना घेऊन उत्तर प्रदेशातील गावी आपल्या माहेरी निघून गेली होती. पण तिथे भावाने समजूत काढून तिला परत पुन्हा 14 मार्चला पतीकडे मुंबईला पाठवलं. एवढंच नाहीतर त्यांच्यामधील वाद मिटवण्याचा प्रयत्नही भावाने केला होता. पण घटनेच्या दिवशी नराधम नवऱ्याने युक्ती करून मेहुणा आणि आपल्या मोठ्या मुलाला घरात कोंडून ठेवलं. त्यानंतर पुष्पाला मुलुंड रेल्वे स्टेशनवर गाठलं.

संबंधित पोस्ट

सामाजिक योगदानासाठी रक्तदान चळवळ उभी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- जिल्हाधिकारी कार्यालयात 101 अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान – ⁠101 पिशव्या रक्त संकलित

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

162 व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धारावी विभागात या जनता पार्टी धारावी विभागातील 90 फूट रोड कामराज शाळेसमोर मोफत वह्या वाटप आणि परीक्षा पॅड वाटप…

vishwatmaklokswamivarta

पुणे महापालिकेतील वाढीव दराच्या घनकचरा निविदा रद्द- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार