vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकठळक बातम्या

भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान

भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान..

 

राज्य प्रतिनिधी -भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान.सिप्पी यांच्या गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून, भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र मंडळाने विशेषत्वाने तयार केलेली दोन छायाचित्रित पोस्टकार्ड्स आणि एक सादरीकरण संचांचे आज अनावरण केले. यावर एक खास सोनेरी रंगातील रद्दीकरणाचा शिक्का देखील आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 1975 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा सोहळा आयोजित केला गेला होता.

या समारंभात, महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल, अमिताभ सिंह यांच्या हस्ते या विशेष छायाचित्रित पोस्टकार्ड्स आणि सादरीकरण संचांचे अनावरण करण्यात आले. आणि शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना पहिला संग्रह भेट दिला गेला.

डावीकडून उजवीकडे: शहजाद सिप्पी, अमिताभ सिंह (मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र मंडळ), रमेश सिप्पी (शोले चे दिग्दर्शक), शिवेंद्र सिंह डुंगरपूर, किरण जुनेजा सिप्पी, रोहन सिप्पी आणि इतर मान्यवर.या कार्यक्रमाला शहजाद सिप्पी, रोहन सिप्पी, किरण जुनेजा सिप्पी आणि शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींसह, टपाल सेवेच्या मुंबई मंडळाच्या संचालक काईया अरोरा, टपाल सेवेच्या मुख्यालयातील महाराष्ट्र मंडळाच्या संचालक सिमरन कौर आणि मुंबई जीपीओच्या संचालक रेखा रिझवी हे टपाल विभागातील वरीष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

‘शोले’ या चित्रपटाची लोकप्रियता आजही टिकून आहे, त्यामुळे या प्रकाशन कार्यक्रमाला अनेक तिकीटसंग्राहक आणि चित्रपटप्रेमीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अर्ध्‍या शतकाचा काळ उलटला आहे, आजच्या काळातही ‘शोले’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासा

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा*

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

vishwatmaklokswamivarta

ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून-पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन-अमेरिकेच्या ‘द रॉकफेलर फाउंडेशन’, ‘ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट’ व ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम

vishwatmaklokswamivarta