vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची शंभर टक्के कामगिरी**रायगड जिल्ह्यात प्रक्रिया पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ*

*मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची शंभर टक्के कामगिरी**रायगड जिल्ह्यात प्रक्रिया पूर्ण करणारा पहिला विधानसभा मतदारसंघ*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाने शंभर टक्के कामकाज पूर्ण करत रायगड जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ होण्याचा मान मिळविला आहे

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीच्या पुनरिक्षणाचे काम करत आहेत

१९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा या तालुक्यांतील एकूण ३५१ मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदारसंघात एकूण २ लाख ६२ हजार ६८० मतदार असून त्यामध्ये १ लाख ३४ हजार १५८ महिला आणि १ लाख २८ हजार ५२२ पुरुष मतदारांचा समावेश आह

*एसआयआर प्रक्रियेतील प्रमुख कामगिरी*EF डिजिटायझेशन पूर्ण – २,३३,३६३ (८८.८४ टक्के)प्राप्त न झालेली गणनापत्रके- २९,३१७ (११.१६टक्के)मृत-८५६८शोधून न सापडलेले/अनुपस्थित – १,१०७कायमस्वरूपी स्थलांतरित – १६,०५०अन्यत्र नोंदणीकृत – ३,५४८इतर-४४मॅपिंग नसलेली प्रकरणे- १२,६७१ (४.८२टक्के)

ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, केंद्रप्रमुख, महसूल कर्मचारी, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच विविध शासकीय कार्यालयांतील निवडणूक नायब तहसीलदार, कर्मचारी, ऑपरेटर, संकलन पथक आणि आयटी पथक यांनी मोलाचे योगदान दिले.

पुढील टप्प्यात २७ जुलै ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बीलओ स्तरावर अन कलेक्टेबल ईएफची फेरपडताळणी, अनमॅपड मतदारांचे मॅपिंग तसेच अनोमालिस दूर करण्याचे काम करण्यात येणार आहे.डिजिटायझेशन झालेल्या ईएफची तपासणीही करण्यात येणार आहे.

********

संबंधित पोस्ट

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन दिनानिमित्त पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत महापूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप

vishwatmaklokswamivarta

बँकांनी विविध महामंडळांची प्रलंबित प्रकरणे निकालात काढावीत..

vishwatmaklokswamivarta

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव