vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले**’मागेल त्याला काजू’ व व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत काजू व आंबा घन लागवडीचा शुभारंभ*

*फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवा-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले**’मागेल त्याला काजू’ व व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत काजू व आंबा घन लागवडीचा शुभारंभ*

रायगड-अलिबाग प्रतिनिधी)-पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीसारख्या शाश्वत पर्यायांचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आंबा, काजू यांसारख्या फळपिकांची लागवड करावी. कृषी व फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केले.

मौजे विन्हेरे येथे किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर ‘मागेल त्याला काजू’ योजनेअंतर्गत ०.२० हेक्टर क्षेत्रावर सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून काजू लागवडीचा, तर मौजे नातोंडी येथे ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत ०.२५ हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचा शुभारंभ रोजगार हमी मंत्री श्री. गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, पंचायत समिती सभापती श्रीमती सावंत, पंचायत समिती सदस्य श्री. खिडबिडे, श्रीमती म. माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. खटकळे, तहसीलदार श्री. शितोळे, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. गोगावले म्हणाले की, अनेक ठिकाणी शेती पडिक राहत असल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनीवर फळबाग लागवड करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करावेत. व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत आंबा घन लागवडीसाठी १०० झाडांपर्यंत सुमारे ७० हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांच्या कालावधीत दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने फळबाग विकसित करावी. कृषी विभाग, फलोत्पादन विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणा शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शासनाची ‘मागेल त्याला काजू’ ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. काजू हे दीर्घकाळ शाश्वत उत्पन्न देणारे पीक असून त्याचे नुकसान जनावरांकडून तुलनेने कमी होते. या योजनेअंतर्गतही शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन काजू लागवड करावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. फळबाग लागवड ही भविष्यातील शेतीसाठी महत्त्वाची दिशा असून या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

*******

संबंधित पोस्ट

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

महिला शेतकरी गटांना कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी अर्ज करण्यास 25 एप्रिलपर्यत मुदतवाढ

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय – पालकमंत्री शंभूराज देसाई कारगिल विजय दिनानिमित्त वीरमाता, वीरपत्नी व वीरपिता यांचा सत्कार

जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहून त्यांना शासकीय मदत तत्परतेने उपलब्ध करून द्या,वनसंपदेचा महसूल वाढवण्यासाठी फर्निचर निर्मितीवर भर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विटा नगरपरिषदेचा सन्मान- ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024 सुपर स्वच्छता लीग मध्ये देशात प्रथम- 20 ते 50 हजार लोकसंख्या गटामध्ये कामगिरी- कचरामुक्त शहराचे पंचतारांकित मानांकन