vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी…

 नवी मुंबई प्रतिनिधी

एसआयआर अंतर्गत मतदार गणनाअर्ज दाखल करण्याची 17 ऑगस्टपर्यंत शेवटची संधी,गणनाअर्ज न भरल्यास मतदारयादीतून रद्द होणार नाव – पुन्हा नाव दाखल करण्यासाठी नव्याने करावी लागणार संपूर्ण कार्यवाही• मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) 30 जूनपासून सुरू असून त्या अंतर्गत गणनाअर्ज दाखल करण्यास आता 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली आहे. ही अखेरचीच मुदतवाढ असून या मुदतीत नागरिकांनी आपले मतदार गणनाअर्ज संबंधित मतदान केंद्र अधिकारी (BLO) यांचेकडे जमा न केल्यास प्रारूप मतदार यादीतून त्या मतदाराचे नाव वगळले जाणार आहे.

• त्यामुळे मतदारयादीत पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6 भरून सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. तरी मतदार नागरिकांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन मतदारयादीत आपले नाव राहण्यासाठी आपले गणनाअर्ज आपल्या मतदारयादी भाग क्रमांकाच्या बीएओकडे जमा करावेत असे आवाहन करण्यात येत आहे. • महत्वाचे म्हणजे गणनाअर्ज भरताना सन 2002 च्या यादीत आपला वा आपल्या पालकांच्या नावाचा तपशील सापडला नाही तरीही फक्त गणनापत्राच्या कॉलम 3 मध्ये आपली सध्याची माहिती भरून व आपली स्वाक्षरी करून मतदार नागरिकांनी आयोगाने जाहीर केलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र त्या अर्जासोबत जोडून आपले गणनाअर्ज (Enumeration Form) आपल्या भागातील बीएलओ यांच्याकडे जमा करावेत असेही सूचित करण्यात येत आहे.

• नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार या शनिवारी, रविवारीही दि. 8 व 9 ऑगस्ट 2026 रोजी विशेष एसआयआर कॅम्प 179 ठिकाणी सुरू ठेवण्यात येत असून आपल्या भागातील एसआयआर कॅम्पच्या ठिकाणांची माहिती नागरिकांना पुढील लिंकवर सहजपणे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1Bfe5CktY8/ या लिंकवर तसेच 151 बेलापूर करिता https://www.facebook.com/share/p/17jfzFuWJu/ या लिंकवर एसआयआर विशेष कॅम्प ठिकाणे सहज उपलब्ध आहेत.

• त्याचप्रमाणे विशेषत्वाने 150 ऐरोली मतदारसंघात ज्या भाग क्रमांकामध्ये गणना अर्जांचे संकलन व डिजीटलायझेनचे प्रमाण कमी आहे त्या ठिकाणी सायं. 7 ते 10 या वेळेत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार विशेष कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. या माध्यमातून ज्या भागांमध्ये नागरिकांना कामाला जाण्याच्या व येण्याच्या वेळी उशीरा आहेत त्यांना आपला गणनाअर्ज भरून बीएलओ यांच्याकडे जमा करणे सोयीचे ठरेल. • नागरिकांना आपल्या मतदार यादी भाग क्रमांकाचे बीएलओ कोण आहेत याची माहिती –   150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1DWA4rSkHv/ या लिंकवर    तसेच 151 बेलापूर करिता https://www.facebook.com/share/p/19FVzXaDvf/ या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. • आजपर्यंत 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघात 4,97,380 मतदारांपैकी 4,71,597 गणनाप्रपत्रांचे वितरण झालेले असून 2,36,001 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे माहिती भरून जमा करण्यात आलेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे.

• त्याचप्रमाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील 4,22,317 मतदारांपैकी 4,14,555 गणनाप्रपत्रांचे वितरण झालेले असून 2,27,950 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे आवश्यक माहिती भरून जमा झालेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे. • गणनाप्रपत्रे दाखल करण्यासाठी आता 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून ही अखेरची संधी समजून नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव अबाधित राहण्यासाठी आपले गणनाप्रपत्र संबंधित बीएलओकेडे शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता या शनिवारी, रविवारी आपल्या भागात लागणा-या विशेष कॅम्पमध्ये जमा करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटीबद्ध

vishwatmaklokswamivarta

आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवाआता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. संजय लाखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती*

अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू–अपर जिल्हादंडाधिकारी