vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक

आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड आवश्यक

आरोग्य प्रतिनिधी -बुलढाणा, : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयो वंदना कार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान व वयो वंदना कार्ड तयार करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांना लाभ मिळणार असून योजनेंतर्गत 2 हजार 399 विविध आजारांवर मोफत उपचार उपलब्ध आहेत. 70 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी वयो वंदना कार्ड तयार करण्यात येत आहे. हे कार्ड तयार करण्यासाठी beneficiary.nha.gov.in या पोर्टलवर जाऊन “For Senior Citizens of the age of seventy years and above CLICK HERE TO ENROLL” या लिंकवरून नोंदणी करून कार्ड तयार करता येते.

वयो वंदना कार्डसाठी आवश्यक बाबी : नागरिकाचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे, आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक.आयुष्मान कार्डसाठी आवश्यक बाबी : अद्यावत शिधापत्रिका व 12 अंकी शिधापत्रिका क्रमांक, आधार कार्ड व आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक.

नागरिकांना सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र, आशा स्वयंसेविका तसेच रेशन दुकानदार यांच्यामार्फत आयुष्मान व वयो वंदना कार्ड तयार करून घेता येणार आहे. पात्र नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

00000

संबंधित पोस्ट

गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्धतेसाठी मानक कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश  

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

एमबीबीएस वैद्यकीय  शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

vishwatmaklokswamivarta

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

ठाणे जिल्ह्यात कर्करोग निदानासाठी फिरती कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-मुलींच्या जन्माकडे सकारात्मकतेने बघा-:

vishwatmaklokswamivarta