vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सिल्लोड येथे आज (दि.२६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

सिल्लोड येथे आज (दि.२६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतिने मंगळवार दि.२६ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिल्लोड येथे पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात मेटलमन ऑटो लि., यशश्री प्रेस कॉम्प्स प्रा.लि., नहार ग्रुप इंडिया, व्हेरॉक इंजिनिअर लि. वाळूज, अशा चार आस्थापनांकडून १८६ रिक्तपदे प्राप्त झालेली असून ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत घेणार आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच एस सी, एस एस सी उतीर्ण इत्यादी पात्रताधारक युवक युवतींना पात्रतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे किंवा बायोडाटाच्या चार प्रती घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

संकेतस्थळावर नोंदणी करताना अथवा रिक्तपदांसाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४०-२९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दि.२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहून रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुरेश बहुरे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या-अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवीन 4 कामगार संहितांवर हरकती-सूचना सादर करण्याचे आवाहन

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी: जिल्ह्यात 5 कौशल्य विकास केंद्रप्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन

प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठादारांकडून निविदा मागविल्या