vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार**महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार*

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार**महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा-उपमुख्यमंत्री अजित पवार*

सातारा प्रतिनिधी लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली. त्यांच्या जन्म गावी पसरणी येथे स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल व महाराष्ट्राला अभिमान वाटेल,असे स्मारक उभे करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण पसरणी ता. वाई येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राधाबाई साबळे, यशोमती शिंदे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, राजाराम निकम, संजय साबळे, महंत सुंदरगिरी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य संग्रामात, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा विविध चळवळींमध्ये पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली. शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गाण्यांचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. साने गुरुजी, संत गाडगेबाबा यांच्यासह विविध दिग्गज मंडळींशी त्यांचा संपर्क आला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शाहीर साबळे यांचे विचार पुढच्या पिढीला कळावे यासाठी प्रयत्न करावेत.

सातारा जिल्हाविषयी आपुलकी असून प्रत्येक वेळी जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या माध्यमातून सातारा येथील क्षेत्र माहुली घाटांचा विकास व सुशोभीकरण तसेच अजिंक्यतारा किल्ल्याचे ही संवर्धन केले जाणार आहे

बा.सी. मर्ढेकर यांचे मर्ढे येथील स्मारक पूर्ण झाले असून याचेही उद्घाटन लवकर करण्यात येईल. तसेच सातारा येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे या संमेलनाला शासनामार्फत सर्व ती मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिली.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पद्मश्री लोकशाहीर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्रात चळवतील योगदान व सामाजिक कार्य विसरता येणार नाही. त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले.

शाहीर साबळे यांच्या शाहिरीची दिग्गज मंडळींनी नोंद घेऊन त्यांचे कौतुक केले. राष्ट्रपतींच्याहस्ते शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.पसरणी येथील शाहीर साबळे यांच्या स्मारकाला 30 कोटी निधी लागणार आहे. हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करून शाहीर साबळे यांच्या नावाला साजेल असे स्मारक उभे केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले

०००००

संबंधित पोस्ट

शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ जानेवारी२०११ पूर्वीचे निवासी प्रयोजनाचे अतिक्रमण नियमानुकुल करून घ्यावे- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी 

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

तातडीच्या उपचारामुळे दीड वर्षाच्या अनुजला मिळाले जीवदान**स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक*

भारतीय कामगार सेना- महिको कंपनीमध्ये वेतन वाढीचा ११ वा ऐतिहासिक करार- कामगारांना सोयी-सवलतीसह ४ हजार ५०४ रुपये मासिक वेतन वाढ

vishwatmaklokswamivarta

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे -राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणारआदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा

महसूल विभागाच्या सर्व सेवा नागरिकांना वेळेत मिळण्यासाठी महसूल यंत्रणेने काम करावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा…