vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

   लातूर प्रतिनिधी-  अचानकपणे विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस रविवारी सायंकाळी झाला यामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गव्हाण, इंदरठाणा परिसरात मोठे नुकसान झाले या नुकसानीची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा संबंधितांना सूचना दिल्या.

         रेणापूर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळ वाऱ्या होऊन अवकाळी जोरदार पाऊस झाला. गारांचाही सडाका पडला यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, पोल तुटून पडले, डिपी उध्वस्त झाल्या, पत्रे उडाली, गव्हाण येथे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले, इंदरठाणा येथे शेतात वीज पडून शेतगड्याचा दुर्दैवी अंत झाला. सदरील नुकसानीची माहिती मिळाल्याने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, पंचायतराज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष शरद दरेकर, सतीश आंबेकर, दशरथ सरवदे, अभिषेक अकनगिरे, श्रीकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी होते.

 वादळ वाऱ्यात घरावरील पत्रे उडून घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्याचे नुकसान झालेल्या गव्हाण येथील दयानंद ज्ञानोबा पवार आणि सुमनबाई भाऊसाहेब पवार यांच्या घराची पाहणी करून वैयक्तिक आर्थिक मदत केली. त्याचबरोबर सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी. इंदरठाणा येथील मयत शेतगडी गुणाजी कदम यांच्या परिवारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून मदत करावी अशा सूचना आ कराड यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

   यावेळी गटविकास अधिकारी सुमित जाधव, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, कृषी अधिकारी नितीन कांबळे, मराविमचे उप अभियंता काळे, मंडल निरीक्षक एस ए गायकवाड, तलाठी डी आर मोरे, त्याचबरोबर गव्हाण इंद्रठाणा परिसरातील वाजीद शेख, शिवमूर्ती उरगुंडे, बाळू कटके, परमेश्वर जाधव, दिनकर राठोड, पृथ्वीराज उरगुंडे, उज्ज्वल कांबळे, उत्तम राठोड, गुणवंत जोगदंड, बालासाहेब माने, देवानंद शिंदे, बालासाहेब बरीदे, सुभाष रायनूळे, गणपत पवार, काशीराम पवार, राम बरीदे, जगनाथ पवार, भारत वाघमारे, जनार्धन पवार, बळीराम बरीदे, विजयकुमार पवार शहाजी पवार शिवाजी पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने होते.

संबंधित पोस्ट

पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेषसरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त यंदाचा ३१ ऑक्टोबर रोजीचा ‘राष्ट्रीय एकता दिवस’ असेल विशेष

vishwatmaklokswamivarta

महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या वन स्टॉप क्रायसिस सेंटर (सखी केंद्र) तसेच शासकीय महिला आधारगृहांमधील सेवांचा, सखी केंद्रे आणि महिला आधारगृहांमधील निवारा, कायदेशीर मदत, आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चात २१ जुलै समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मिलिंद बोर्ड यांचे आवाहन

निर्यात क्षेत्रास प्रोत्साहन आणि रोजगार निर्मितीसाठी कार्यशाळा उपयुक्त  –जिल्हाधिकारी किशन जावळे