अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) या महामंडळामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मांग. मातंग, मिनी मादीग, मादोग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थी/विद्यार्थीना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी जिल्ह्यातील प्रथम 01 ते 03 किंवा 05 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर “अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येतो.
त्यानुषंगाने मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थीनी दि.20जुलै2025पर्यंत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा माळा, दत्तवाडी, श्री स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेच्या बाजूला, खारेगांव, कळवा (प.), जिल्हा ठाणे-400605 येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाव्दारे अर्ज सादर करावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, ठाणे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब तडाखे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती अर्ज करण्याचा अंतिम दि.20 जुलै 2025 हा असून त्यानंतर शिष्यवृत्तीचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, अर्जासोबत पुढीलप्रमाणे कागदपत्रे जिल्हा कार्यालय, ठाणे येथे सादर करावीत. 1. अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी हस्तलिखित अर्ज. 2. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची मार्कलिस्ट. 3. शाळा सोडल्याचा दाखला. 4. जातीचा दाखला. 5. पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती. 6. रेशनकार्ड. 7. आधारकार्ड, असेही जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब तडाखे यांनी कळविले आहे.