vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळस्थानिक बातम्या

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

ठाणे, प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ठाणे व बी.के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये दि.23 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. ऑलिंपिक दिनानिमित्त बी. के. बिर्ला महाविद्यालयामध्ये क्रीडा विषयक प्रश्न मंजूषा, फूटबॉल व हॅंडबॉल खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांकरिता कल्याण शहरातील विविध शाळा महाविद्यालय यांच्यातर्फे सहभाग नोंदविला गेला. ऑलिंपिक दिनाच्या उद्घाटन प्रसंगी मेजर ध्यानचंद व ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीमती सुवर्णा बारटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांनी उपस्थित खेळाडूंना खेळामध्ये अधिकाधिक मेहनत घेऊन नावलौकिक उंचविण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहण्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

बी.के.बिर्ला महाविद्यालयातील 2 खेळाडू कावासाकी जपान, येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय जंपरोप स्पर्धेत सहभागी होत असल्याने या खेळाडूंनी जंपरोप या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची वाहवा मिळविली. कार्यक्रमप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक समीर सूर्यवंशी, बी. के. बिर्ला महाविद्यालयाचे संचालक (शिक्षण ) डॉ.नरेश चंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे चेअरमन श्री. अनिल तिवारी, संचालक श्री. यज्ञेश्वर बागराव, क्रीडा शिक्षक श्री. चिंतामण पाटील, श्री. राकेश ठाकरे, श्री. अक्षय टेंभे, श्री. शुभम मोहोपे तसेच श्री. मनिलाल शिंपी उपस्थित होते.

0000000000

संबंधित पोस्ट

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

विकसित भारत – रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण (VB-GRAMG) अभियानाचा भिवंडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभग्रामीण कुटुंबांना १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी; आत्मनिर्भर आणि समृद्ध गावांच्या निर्मितीकडे महत्त्वपूर्ण पाऊल

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन