vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कडधान्य व तृणधान्य सन २०२५-२६ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील तीनही जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त आहे. पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने जिल्हानिहाय व पीकनिहाय प्रमाणित बियाणे वितरणाचे लक्षांक प्राप्त झाले आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कडधान्य अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हरभरा पीकासाठी 10 वर्षाआतील प्रमाणित बियाणे वितरण अनुदान 50 रू. प्रति किलो नुसार 740 असा राहील. जालना जिल्ह्यासाठी 950, तर बीड जिल्ह्यासाठी 1640 याप्रमाणे एकूण 3330 असणार आहे. तर 10 वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरण अनुदान 25 रु. प्रति किलोनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 799, जालना जिल्ह्यासाठी 2472 तर बीड जिल्ह्यासाठी 1584 या प्रमाणे एकूण 4855 असणार आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान तृणधान्य अंतर्गत रब्बी ज्वारी पीकासाठी 10 वर्षा आतील प्रमाणित बियाणे वितरण अनुदान 30 रु. प्रति किलोनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 140, जालना जिल्ह्यासाठी 270 तर बीड जिल्ह्यासाठी 520 असे एकूण 930 असणार आहे. तर 10 वर्षावरील प्रमाणित बियाणे वितरण अनुदान 15 रु. प्रति किलो प्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 370, जालना जिल्ह्यासाठी 700 तर बीड जिल्ह्यासाठी 1350 असे एकूण 2420 असणार आहे.प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्याच्या अटी व शर्ती: प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत आर्थिक सहाय्य मिळण्याच्या अटी व शर्तीघटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल १ हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. शेतकऱ्यास महाबिज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको इ. बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत सातबारा उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर प्रमाणित बियाणे वितरण करणाऱ्या संबंधित संस्थांमार्फत बियाणे वितरण करण्यात येणार आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी, कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीत १६३५ प्रकरणात १८ कोटींहून अधिक रकमेची तडजोड

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एक दिलाने काम करुया-पालकमंत्री शंभूराज देसाई

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी*-पालकमंत्री शंभूराज देसाई*

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

शिक्षक मतदारसंघाच्या नव्याने मतदार नोंदणीसाठी 6 नोव्हेंबरपर्यंत मुदत;पात्र शिक्षकांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची आध्यात्मिक सांगीतिक मानवंदना

vishwatmaklokswamivarta