vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

जालना/प्रतिनिधी-पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघच्या महाराष्ट्र संघटकपदी जालना येथील जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांची ही नियुक्ती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय संघटक कैलास देशमुख यांनी एका नियुक्तीपत्रकाव्दारे केली आहे.

विकासकुमार बागडी हे मागील 28 वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात आहे. ते पत्रकारांचे विविध प्रश्‍न व हितासाठी काम करीत असून, त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांना महाराष्ट्र संघटकपदाची जवाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात पत्रकारांची एकजुट करण्यासह त्यांच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही नुतन महाराष्ट्र संघटक विकासकुमार बागडी यांनी दिली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसूफखान पठाण, केंद्रीय नियोजन समिती अध्यक्ष सुरेश सवळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, राष्ट्रीय महासचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश महिला मंच सरचिटणीस कांचनताई मुरके , तसेच जिल्ह्याचे जेष्ठ पत्रकार, संपादक, जिल्हा प्रतिनिधी, उद्योजक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ता आदिंनी अभिनंदन केले आहे

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार-2023-24 प्राथमिक छाननी अहवालात,केलेल्या पुरस्कार गुणांकनाबाबत आक्षेप किंवा सूचना 18 फेब्रुवारी पर्यंत सादर कराव्यात

vishwatmaklokswamivarta

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

लम्पी आजाराच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच करा उपाययोजना; कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा

महसूल कायदे व चॅप्टर प्रकरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यातल्या एक हजार आयटीआयमध्ये विभाजन विभीषिकेचे स्मरण