vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

लम्पी आजाराच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच करा उपाययोजना; कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

लम्पी आजाराच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच करा उपाययोजना; कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

 

बुलडाणा, प्रतिनिधी जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत असलेल्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुपालकांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणामार्फत जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, पशुपालकांना शिफारशीत उपाययोजना करून या विषाणूजन्य रोगापासून जनावरांचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषि विज्ञान केंद्राकडून करण्यात येत आहे

रोगाचे कारण व प्रसार: लम्पी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) हा एक विषाणूजन्य चर्मरोग असून, तो कॅप्रीपॉक्स व्हायरसमुळे होतो. रोगाचा प्रसार प्रामुख्याने चावणाऱ्या माश्या, डास, गोचीड, चिलटे यांच्या माध्यमातून, बाधित व निरोगी जनावरांच्या संपर्कातून, नाक-डोळ्यातील स्त्राव, तोंडातील लाळ चाऱ्यावर व पाण्यावर लागल्यास संसर्ग होतो. या रोगाचा सर्व वयोगटातील जनावरांवर परिणाम होतो, मात्र लहान वासरे अधिक प्रभावित होतात. उष्ण आणि दमट हवामानात कीटकांची वाढ अधिक असल्याने पावसाळ्यात प्रादुर्भाव वाढतो.

लक्षणे : ताप येणे व दुध उत्पादनात घट, डोळ्यातून पाणी येणे, लसिका ग्रंथीना सूज, त्वचेवर गाठी (१०-५० मिमी व्यासाच्या), मुख्यतः डोके, मान, पायावर, फुप्फुसदाह, कासदाह, गर्भपात व प्रजनन क्षमतेत घट, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होणे या रोगाचे लक्षणे आहे.

उपचार व घरगुती उपाय : प्रतिजैविके, ज्वरनाशक, जीवनसत्त्वे (A व E) व शक्तिवर्धक औषधांचा वापर, त्वचेवरील व्रणांवर फ्लाय रिपेलंट स्प्रे, तोंडातील व्रणासाठी २% पोटॅशियम परम्यांगनेट द्रावण व बोरोग्लीश्रीन.

घरगुती उपाय: १० खायची पाने, १० ग्रॅम मीरे, १० ग्रॅम मीठ यांची पेस्ट करून त्यात गूळ मिसळून जनावरांना द्यावी, पहिल्या दिवशी दर ३ तासांनी, दुसऱ्या दिवशीपासून दिवसातून ३ वेळा १५ दिवसपर्यंत, जखमांमध्ये किडे पडल्यास खोबरेल तेलात कापूर, सीताफळाच्या पानांचा लेप लावावा.

रोगनियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय : बाधित व निरोगी जनावरांना वेगळे ठेवावे, एकत्रित चारा-पाणी देऊ नये, गोठ्याचे नियमित फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण(०.०१% डेल्टामेथ्रीन), पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करावे, गोठा स्वच्छ ठेवणे, माशा व डास यांचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे.

 या आजारावर उपाय करण्यापेक्षा प्रतिबंध करणे महत्त्वाचे असून, पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि नियमित सल्ला घ्यावा. जनावरांचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच लसीकरण करून घ्या, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांची तपासणी करावी – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचामुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ•उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती

जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदी भाजपाच्या नगरसेविका श्री.वंदना अरुण मगरे यांची तर उपमहापौर पदी श्री.राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे..

vishwatmaklokswamivarta

गोव्याच्या अर्पोरा परिसरातील ‘बर्च बाय रोमियो लेन्स- 25 पैकी 23 गुदमरुन दगावले, आग लागल्यावर कर्मचारी का पळाले नाहीत? मृतांमध्ये दोघे महाराष्ट्राचे,  यादी

vishwatmaklokswamivarta

प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी चेकपोस्टवर भरारी पथकांनी तपासणी करावी-जिल्हाधिकारी विनय गौडा जी .सीकत्तलखान्यास भेट देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट