vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवा!जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवा!जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी विकसित महाराष्ट्र 2047 करिता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा, विचार व समस्या समजुन घेण्यासाठी नागरिक सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी नागरिक सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. विकसित महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी https://wa.link/o93s9m या लिंकचा वापर करावा.

सर्वेक्षणात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शासनाने सर्व विभागांना व प्रशासन यंत्रणेला व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालये, स्थानिक केबल नेटवर्क, एफ.एम. रेडिओ, साप्ताहिके, वर्तमानपत्रे, बाजारपेठा, गावाच्या वेशीवर फलक, व्हाट्सॲप ग्रुप, पथनाट्य आणि फिरती प्रचारवाहने आदी माध्यमांचा समावेश आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे आणि जिल्हा विकास प्रक्रियेत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करणे होय.

या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात 7 सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन, त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विकसित महाराष्ट्र 2047 करिता नागरिक https://wa.link/o93s9m या लिंकवर 17 जुलै 2025 पर्यंत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

संबंधित पोस्ट

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• आयुष्मान भारत कार्ड निर्माण व वितरण गतिमान करण्याच्या सूचना

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ महत्त्वाचे – प्रा. मोहन नेहरे  

vishwatmaklokswamivarta

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निर्बंध.

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta