vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर 

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर

 

नांदेड प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पुढे नमुद यात्रा व सणाच्या दिवशी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.

मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स, शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन तर शुक्रवार 18 सप्टेंबर 2026 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

या तीन दिवसाच्या स्थानिक सुट्या नांदेड जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार, उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. तसेच हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू होणार नाही, असेही अधिसुचनेत नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

डी.ए.पी. खतास पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत-इस्राईल येथे रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य —-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

ऑनलाइन लर्निंग लायसन्स चाचणी बंद

vishwatmaklokswamivarta