vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

         राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा, त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते

  केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत व नगरोत्थान अभियनांतर्गत तसेच इतर केंद्र पुरस्कृत व राज्य योजनेंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी स्वहिश्श्यापोटी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उभा करावा लागतो. त्यासाठी राज्यात महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत हडको या वित्तीय संस्थेकडून हे कर्ज घेण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीचे 822 कोटी 22 लाख, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिःसारण प्रकल्पासाठी 268 कोटी 84 लाख रुपये व मिरा-भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाच्या हिश्श्यापोटीच्या 116 कोटी 28 लाख रुपयांच्या प्रस्तावांसह, अन्य स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मागण्यांचा समावेश आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास शासन हमी देण्याचा व त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

***

संबंधित पोस्ट

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम’ आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल; राज्यात कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानांतर्गतगावांच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेमलकापूर येथे तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न..

vishwatmaklokswamivarta

मराठीवरील प्रभुत्त्व, निस्सीम प्रेमाचा उत्तुंग आदर्श मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली