vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याचा परिपाक म्हणूनच जिह्यातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत या अभियानादरम्यान लक्षणीय वाढ झाली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर 2025 या तीन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींची तब्बल 90 कोटी 77 लाखांची वसुली आहे. या वसुलीमुळे ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.

  रायगड जिल्ह्यात शासनाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टीची मोठी थकबाकी राहिल्याने या अभियानांतर्गत थकबाकी भरणासाठी ग्रामपंचायतींतर्फे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींना सोमवारी व शनिवारी असे दोन दिवस घरपट्टी भरणासाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत घरपट्टीवर 50 टक्के सुट शासनातर्फे देण्यात आली. या सवलतीचा लोभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घेउन अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.

    अभियान कालावधीतच 13 डिसेंबर राजी आयोजिक करण्यात आलेल्या लोकअदालतीमुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली. यातील 8 हजार 316 प्रकरणांचा निपणारा करून 6 कोटी 80 80 लाख 14 हजार 963 रुपयांची घरपट्टी वसूल होण्यास मदत झाली.     रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यावर विशेष भर दिला जात आहे. वाढीव घरपट्टी वसुलीमुळे ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधा, विकासकामे व लोकहिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहे.

   *…यामुळे झाली घरपट्टी वसुलीत वाढ:*- समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी वसुलीसाठी सोमवार व शनिवारी विशेष कॅम्पचे आयोजन- घरपट्टी करावर 50 टक्के सवलत लोकअदालतीत ठेवलेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा- जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडून ऑनलाईन पेमेंटची सुविधा*पाणीपट्टी वसुलीतही एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यान 50.56 टक्के वसुली झाली असून समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यान सुमारे 9 कोटींची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे लोकअदालतीमध्ये पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील 1 हजार 474 प्रकरणांचा निपटारा झाला असून 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 रुपयांची वसुली झाली आहे.*

*जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून एप्रिल ते डिसेंबर 2025 या कालावधीत तब्बल 62 टक्के घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे घरपट्टी वसुलीला गती मिळाली आहे. हे अर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे पुढील तीन महिन्यात ही वसुली 90 टक्क्यांपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतींनाही सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतींना घरपट्टी भरून सहकार्य करावे.**– नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड, जिल्हा परिषद*

संबंधित पोस्ट

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रात्रीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी नव्या भारताचे आधारस्तंभ – प्राचार्य डॉ. धनंजय पष्टे

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

सहकारी उपसा जलसिंचन योजनांची थकबाकी बँकांनी वसुली करू नये- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा