vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सहकारी उपसा जलसिंचन योजनांची थकबाकी बँकांनी वसुली करू नये- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

सहकारी उपसा जलसिंचन योजनांची थकबाकी बँकांनी वसुली करू नये- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, प्रतिनिधी:- राज्यातील २६१ सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या कर्जाच्या थकबाकी संदर्भात निर्णय होईपर्यंत संबधित संस्था, शेतकरी यांच्यावर संबंधित बँकांनी जप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करू नये. यासंदर्भात संबंधित बँकांना शासनामार्फत सूचना दिल्या जातील, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले

राज्यातील २६१ सहकारी उपसा सिंचन योजनांची थकबाकी कर्जमाफी संदर्भात सदस्य डॉ. विनय कोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या उत्तरात सदस्य नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

राज्यातील २६१ सिंचन योजनांची थकबाकी कर्जमाफी संदर्भात १४ ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत, केवळ १३२.२४ कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये व्याजाच्या रकमेचा समावेश नव्हता. भारतीय रिझर्व बँकेने कर्जमुक्ती संदर्भात केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता व्याजाच्या रक्कमेसह सर्व रक्कमेस मंत्रिमंडळाची पुन्हा मान्यता घेणे आवश्यक असल्याचे सहकार मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेत कुटुंबातील एकाच महिलेला शिलाई मशीनचा लाभ – उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन३० जुलै रोजी महिला महाविद्यालयात स्पर्धा; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

आज*राष्ट्रीय लोकअदालतीचे  आयोजन*

vishwatmaklokswamivarta

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..