vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्यास्थानिक बातम्या

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई, प्रतिनिधी: केंद्रीय मार्ड ने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच सेन्ट्रल मार्डचे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते.

या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी रहिवासी डॉक्टरांचे विषय, मागण्या आणि मांडलेल्या मुद्द्यांकडे लक्षपूर्वक ऐकून घेतले. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, आंदोलनामुळे रुग्णसेवेत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांनी सध्या सुरू असलेला संप मागे घ्यावा. तसेच राज्य शासन या मागण्यांवर गांभीर्याने चर्चा करीत असून तातडीने पुढील पावले उचलली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत मुख्यमंत्री महोदयांसोबत ‘मार्ड’च्या मागण्यांवर लवकरच चर्चा होणार असल्याची माहिती दिली.

रम्यान, सेन्ट्रल मार्डचे च्या प्रतिनिधींनी शासनाकडून अधिकृत लिखित आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. रहिवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

राज्य शासन व मार्ड यांच्यातील पुढील चर्चेनंतर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला; ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल

vishwatmaklokswamivarta

राज्य लॉटरीच्या ऑक्टोबर महिन्यातील-मासिक, साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

रमजान निमित्त भामला फाउंडेश तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप*

vishwatmaklokswamivarta

बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेणारभविष्यात बिबट्यांच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही यासाठी यंत्रणा सतर्क– वन मंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

अक्कलकोट बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे ५५ टक्के काम पूर्ण- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न