vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू

राज्यातील पर्यटकांसाठी मोठी खुशखबर-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू…

नेरूळ प्रतिनिधी-

माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू होत आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ही सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माथेराच्या मिनी ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या पर्यटकांची प्रतीक्षा संपली असून गुरुवारपासून नेरळ-माथेरान मार्गावरील मिनी ट्रेन सुरू होणार असल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑक्टोबर दरम्यान ही मिनी ट्रेन बंद ठेवण्यात येते. पावसाळा संपल्याने ती पुन्हा सुरू होत आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर ही सेवा पुन्हा सुरू होत असल्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान या टप्प्यात शटल सेवा धावत आहेत.

मिनी ट्रेनला तीन द्वितीय, एक पारदर्शी, प्रथम आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामानवाहू असे सहा डबे असणार आहेत. सोमवार ते शुक्रवारदरम्यान अमन लॉज ते नेरळदरम्यान रोज सहा फेऱ्या धावतात. शनिवारी आणि रविवारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन दोन फेऱ्या वाढवून एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतात.

संबंधित पोस्ट

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी करण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा – मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना विद्यार्थी आणि पालकांशीही साधला संवाद

पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी त्वरीत करावी

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई पोलिसांच्या ASI पी. एन. पाटील यांनी लॉजच्या खोलीत आत्महत्या केली; 8 पानांच्या सुसाईड नोट आणि मोबाईल व्हिडिओमध्ये मृत्यूच्या कारणांचा उल्लेख वरिष्ठ अधिकारी छळवणूक करत असल्याचा आरोप

vishwatmaklokswamivarta