vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

श्री गुरु नानक देव जी जयंती च्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी ..

श्री गुरु नानक देव जी जयंती च्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा..

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते

अध्यात्मिक वार्ता-देशभरात गुरू नानक यांचा जन्म दिन ‘प्रकाश पर्व’ म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या  दिवशी साजरा केला जातो.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा असून, या दिवशी मोठ्या थाटामाटात गुरु नानक जयंती देखील साजरी केली जाईल. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे. गुरु नानक जयंती निमित्त आपल्या प्रियजणांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवून दिवसाचा आनंद द्विगुणीत करा…

गुरू नानक जयंतीचे महत्व-

गुरू नानक जयंती, ज्याला ‘गुरुपूरब’ किंवा ‘प्रकाश उत्सव’ असेही म्हणतात, हा शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले शीख गुरू, गुरू नानक देव जी यांचा जन्मदिवस आहे. गुरु नानक जयंतीचे शिख धर्मीयांसाठी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शीख धर्माचे पहिले गुरू मानले जाणारे गुरू नानक देव यांचे जीवन आणि शिकवण यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. गुरू नानक देव यांनी नेहमीच समानता, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर भर दिला. या दिवशी लोक जात-धर्माचा विचार न करता सर्वांप्रती बंधुता आणि सहिष्णुतेची भावना अंगीकारण्याचा संकल्प करतात. गुरु नानक देव यांनी शिकवले की जात, धर्म किंवा लिंग कोणताही असो, प्रत्येक व्यक्ती देवाच्या इच्छेने निर्माण झाली आहे आणि सर्वांना समानतेने वागवले पाहिजे. गुरु नानक जयंती हा त्यांच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा आणि त्या आचरणात आणण्याचा दिवस आहे.

संबंधित पोस्ट

माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचा सांगली जिल्हा दौरा

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये; दुबार पेरणीचे संकट टाळण्याचे कृषी विभागाचे आवाहन

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

vishwatmaklokswamivarta