vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन३० जुलै रोजी महिला महाविद्यालयात स्पर्धा; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

‘नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन३० जुलै रोजी महिला महाविद्यालयात स्पर्धा; युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी: भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत (MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “नशामुक्त युवा विकसित भारत” या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन ३० जुलै २०२६ रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचलित महिला महाविद्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धांचे आयोजन महिला महाविद्यालय, गडचिरोली, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क आणि माय भारत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे तसेच कला, संस्कृती, साहित्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वाच्या माध्यमातून “नशामुक्त युवा विकसित भारत” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

या स्पर्धेत १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती सहभागी होऊ शकतात. स्पर्धांमध्ये लोकगीत, समूह नृत्य, पथनाट्य/मुक्तनाट्य, चित्रकला, वक्तृत्व, लघुपट/रील, घोषवाक्य लेखन तसेच स्लॅम पोएट्री (काव्य सादरीकरण) अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.

विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २८ जुलै २०२६ पर्यंत MY Bharat Portal वर नोंदणी करून सहभाग निश्चित करावा. तसेच महाविद्यालयांनी आपल्या पात्र विद्यार्थ्यांना या स्पर्धेची माहिती देऊन त्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. योगेश पाटील, फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य डॉ. प्रा. रूपेंद्रकुमार गौर तसेच माय भारत केंद्राचे अधिकारी सारंग मेश्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

#नशामुक्तयुवाविकसितभारत #NashaMuktYuvaViksitBharat #MYBharat #MeraYuvaBharat #गडचिरोली #Gadchiroli #व्यसनमुक्ती

संबंधित पोस्ट

हरित महाराष्ट्र’साठी जिल्ह्यात वृक्ष लागवड उद्दिष्टपूर्तीचे नियोजन करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी जिल्ह्यातील २१,९४० हेक्टरवर २कोटी ४४लाख वृक्षारोपण.

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद… 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह 24 जुलै रोजी नवी दिल्ली येथे ‘राष्ट्रीय सहकार धोरण 2025’ करणार जाहीर नवे सहकार धोरण आगामी दोन दशकांसाठी भारताच्या सहकार चळवळीत ठरणार महत्वाचा टप्पा

विधानसभेत दिवंगत नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली; दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थानाचा विधानसभाध्यक्षांचा प्रस्ताव

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन…

vishwatmaklokswamivarta