vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ : बुलढाण्यात २६ एप्रिल रोजी मतदान

बुलढाणा प्रतिनिधी: महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्या वतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २०२६ साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यात मतदान प्रक्रिया रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा महिला रुग्णालय, टी.बी. हॉस्पिटल परिसर, धाड रोड, बुलढाणा येथे मतदान होणार आहे.

सदर निवडणूक प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी तसेच नोंदणीकृत डॉक्टर हे मतदार म्हणून सहभागी होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकूण २ हजार ६३५ मतदार असून प्रत्येक मतदाराला एकूण ९ मते देण्याचा अधिकार आहे. मतदारांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून एकूण ४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व केंद्रे लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स परिसरातच उभारण्यात आली आहेत.

मतदान प्रक्रिया ही गुप्त पद्धतीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नियम १९६७ व महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (पहिली सुधारणा) नियम २००२ मधील तरतुदीनुसार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी आशेचा किरण..

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!

सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी ‘घाटी’ला ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समिती देणार- पालकमंत्री संजय शिरसाट,स्मशानभुमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदारांस १ कोटी रुपये निधी देण्याचाही निर्णय..

भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सूचना, अभिप्राय देण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन*तक्रारी स्विकारण्यासाठी आठ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांत विशेष कक्ष*

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta