vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

        सांगली, प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष 2026-2027 चे शासकीय, शासन अनुदानित, अनुदानित अल्पसंख्याक, खाजगी विनाअनुदानित आणि विना अनुदानित अल्पसंख्याक महाविद्यालयांचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीए /एमएमएस सीईटी २०२६ द्वितीय परीक्षा तसेच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लानिंग व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2026 प्रवेश परीक्षा द्वितीय परीक्षा दि. 9 ते 20 मे 2026 या कालावधीत जिल्ह्यातील एकूण 8 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. या अनुषंगाने परीक्षा दिनांक व वेळेत परीक्षा केंद्राच्या इमारतीपासून 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.

        महाराष्ट्र विनानुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम-२०१५ मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठीच्या या परीक्षा प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12 व द्वितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत अशा दोन सत्रात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या अनुषंगाने खालीलप्रमाणे परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षा दिनांक व वेळेत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्राचे नाव, परीक्षेचे नाव व दिनांक पुढीलप्रमाणे – 1) गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, मिरज – पीसीएम – दि. 12 ते 20 मे 2026 (दि,16,17,18 वगळून) 2) शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, तासगाव, –पीसीएम – दि. 12 ते 20 मे 2026 (दि,16,17,18 वगळून), 3) पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव – पीसीएम – दि. 12 ते 20 मे 2026 (दि. 16, 17, 18 वगळून) 4) अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आष्टा – पीसीएम – दि. 12 ते 20 मे 2026 (दि,16,17,18 वगळून) 7) जयवंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक, जयवंतनगर, किल्ले मच्छिंद्रगड – पीसीएम – दि. 19 ते 20 मे 2026 8) नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पेठ नाका, ता. वाळवा – पीसीएम – दि. 12 ते 20 मे 2026 (दि. 16, 17, 18 वगळून)

    बंदी आदेशानुसार सदर वेळेत सदर परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व सदर परीक्षेस येणारे वि‌द्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास आदि कृत्यांसह, परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फेंक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापर करण्यास, परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना हा आदेश लागू राहणार नाही

00000

संबंधित पोस्ट

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जनगणना मोहिमेत दोन प्रगणकांनी रचला नवा आदर्श    प्रशासनाकडून सत्कार कडक उन्हातही विक्रमी कामगिरी !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणी कामाचा,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा…

क्रेडाईने एसटी महामंडळाची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta