vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

मतदारयादी मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

       अमरावती, प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरावलोकन जाहिर केला आहे. त्यानुसार याआधी मतदारांची मॅपिंग करण्यात येत आहे. यात मतदारांची मॅपिंग झाली नसल्यास त्यांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मॅपिंगचे कार्य तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

जिल्हा नियोजन भवनात मतदारांच्या मॅपिंगबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महापालिकेचे उपायुक्त महेश देशमुख, योगेश पिटे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी निवडणूक आयोगाने नेमून दिलेले कार्य वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. विशेष संक्षिप्त पुनरावलोकन कार्यक्रमाची जबाबदारी बीएलओवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या मतदारयादीतील मतदारांचा 2002च्या मतदारयादीत शोधावे लागणार आहे. यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे बीएलओंनी प्रत्येक मतदारांचा शोध घेऊन मॅपिंग करणे आवश्यक आहे. मॅपिंगची टक्केवारी कमी झाल्यास उर्वरीत मतदारांना नोटीस देऊन सुनावणी घ्यावी लागणार आहे. हे काम अत्यंत जिकरीचे होणार असल्याने बीएलओंनी मॅपिंगची टक्केवारी वाढविणे आवश्यक आहे

     जिल्ह्यात प्रामुख्याने बडनेरा आणि अमरावती या शहरी भागात मॅपिंगची गती वाढविणे आवश्यक आहे. मतदारांची मॅपिंग झालेली नसल्यास मतदारयादीतील नाव वगळण्याआधी मतदारांकडून फॉर्म नं. सात भरून घेण्याची कारवाई करावी. कमी मॅपिंग झालेल्या क्षेत्रातील मॅपिंगची टक्केवारी वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. त्यामुळे येत्या 15 मेपर्यंत 95 टक्के मॅपिंग होण्यासाठी बीएलओंनी प्रयत्न करावेत. मॅपिंगच्या कामी खासगी संस्थांमधील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित संस्थांनाही पत्र देऊन बीएलओंना शाळेतील कामामधून सूट देण्याची सूचना करण्यात येणार आहे. मॅपिंगच्या कामात अडथळा आणल्यास संबंधित बीएलओंवर फौजदारी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे बीएलओंनी मॅपिंगचे काम काटेकोरपणे पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले

   सुरवातीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी मतदारांच्या मॅपिंगबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मॅपिंगचे कार्य उत्कृष्टरित्या केलेल्या बीएलओंनी मनोगत व्यक्त केले.

000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

जागतिक शौचालय दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला सुरुवात मोहीम १० डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत राबविली जाणार

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण..मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी अथकपणे काम करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही,स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्री यांनी केले अभिवादन..

vishwatmaklokswamivarta