vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*

*दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करा*

 

सातारा प्रतिनिधी – दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून शासनमान्य तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर (जि. नांदेड) येथे विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी दिव्यांग युवक-युवतींकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी ३० जून पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील अस्थिव्यंग, मुकबधिर, अंध आणि मतिमंद दिव्यांग मुला-मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे

प्रशिक्षण केंद्रात विद्युत तारतंत्री, सर्व्हिसिंग ऑफ इलेक्ट्रिक डोमेस्टिक अप्लायन्सेस, मोबाईल रिपेअरिंग अँड सर्व्हिसिंग, फिटर, एलिमेंट ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस. ऑफिस, डेस्कटॉप पब्लिशिंग (DTP), कॉम्प्युटर अकौंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन तसेच अगरबत्ती, खडू व धूपनिर्मिती यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.इच्छुक दिव्यांग युवक-युवतींनी किंवा त्यांच्या पालकांनी ३० जून २०२६ पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, भायेगाव रोड, देगलुर, ता. देगलुर, जि. नांदेड.संपर्क क्रमांक : 9960900369, 9403207100, 7378641136.येथे संपर्क साधावा.

०००००

संबंधित पोस्ट

राजस्थानमध्ये जोधपूर इथं झालेल्या रस्ते अपघातात १९ जणांचा मृत्यू तर तेलंगणमध्ये रंगारेड्डी इथल्या अपघातात १७ जण मृत्यूमुखी, पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख.

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड मधील भव्य कार्यक्रम यशस्वी करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीकार्यक्रमासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना – सचिव रुचेश जयवंशी

प्रमुख प्रचारकांची संख्या आता २० ऐवजी ४०

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट वापरास बंदी