vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना,  (प्रतिनिधी) – भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण हे आज दिनांक १३ जून २०२५ रोजी, “विकसित भारत का अमृत काल – सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचे ११ वर्ष” या पार्श्वभूमीवर जालना शहरात येत आहेत.

दुपारी ४ वाजता कलश सीड्स सभागृह, जालना येथे ते शहरातील व्यापारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर, चार्टर्ड अकाउंटंट, उद्योजक व विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी वर्गाशी थेट संवाद साधणार असून, शहराच्या सामाजिक, औद्योगिक व विकासात्मक दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत व नंतर पत्रकार परिषेद घेणार आहेत.

या कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या महत्त्वपूर्ण संवाद व पत्रकार परिषदेस नागरिक, पत्रकार व सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

बाबासाहेब पाटील कोलते यांची माहिती

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 14 जून रोजी; जालन्यातील 17 परीक्षा  केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश..

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांच्या जीवनात जातीच्या दाखल्यांमुळे सकारात्मक परिवर्तन – अप्पर मुख्य सचिव विकास खारगे- भटक्या समाजातील विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वितरण – पाणंद रस्ते खुले केल्याबद्दल शिष्टमंडळाने व्यक्त केली कृतज्ञता..

vishwatmaklokswamivarta

नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता-पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक* जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण ४००.७८ कोटी* अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी* आदिवासी घटक कार्यक्रम १८.६५ कोटी

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ…

ग्रामपंचायतींमध्ये आपले सेवा केंद्र सुरू करा* जिल्हाधिकारी संतोष पाटील*