vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

 

     नवी मुंबई प्रतिनिधी  -नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ‘गट-क’ आणि ‘गट – ड’ मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची माहिती वर्तमानपत्रांतून तसेच महानगरपालिकेची वेबसाईट व सर्व सोशल मिडिया माध्यमांतून प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

   तथापि मागील आठवड्यात महानगरपालिकेचे बोधचिन्ह असलेले खोटे लेटरहेड व खोटा शिक्का वापरून काहीजणांना नियुक्तीपत्र दिली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस विभागाकडे रितसर तक्रार दाखल करून अशा प्रकारच्या दिशाभूल करणा-या माहितीला बळी पडू नये असे आवाहन वर्तमानपत्रांतून करण्यात आले होते.

 मात्र आता नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाल्याची रितसर जाहीरात वर्तमानपत्रे व इतर माध्यमांतून प्रसिध्द झाल्यानंतरही काही व्यक्ती मागील आठवड्यातील सदर बातमीचा मजकूर सोशल माध्यमांव्दारे फिरवून ही भरती सुरू नसल्याची चुकीची माहिती प्रसारित करीत आहेत.

तरी याव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे की, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता रितसर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे.

तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी नवी मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in यावर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम पेजला भेट द्यावी व याविषयीची अधिकृत माहिती जाणून घ्यावी व अर्ज करावेत असे आवाहन नमुंमपा प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. 

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा बुलढाणा जिल्हा दौरा…

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप..

vishwatmaklokswamivarta