vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

*नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

नवी मुंबई, प्रतिनिधी : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने नवी मुंबईत प्रशासन, विविध सामाजिक व धार्मिक संघटना तसेच आयोजन समिती यांच्या समन्वयातून व्यापक तयारी सुरू असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या ऐतिहासिक समागमासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.

कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत कार्यक्रमाच्या नियोजन, सुविधा व आयोजनासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेस शहीदी समागम समितीचे मार्गदर्शक संत बाबा हरनाम सिंगजी, ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचे सहअध्यक्ष शरदराव ढोले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, सुप्रीम कौन्सिल, नवी मुंबई गुरुद्वाराचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू, धर्मजागरण महाराष्ट्र क्षेत्र प्रमुख महेंद्र रायचुरा, धर्मजागरण कोकण विभाग प्रमुख राजेश कुंटे, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे चरणदीप सिंग (हॅप्पी सिंग), राज्यस्तरीय समितीचे निमंत्रक तथा महाराष्ट्र राज्य पंजाब अकॅडमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी संत बाबा हरनाम सिंगजी यांनी सांगितले की, ‘हिंद-दी-चादर’ शहीदी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा समागम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशभरात या शहीदी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, महाराष्ट्रातील नवी मुंबई येथे होणारा समागम विशेष आणि व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे राज्यस्तरीय समन्वयक रामेश्वर नाईक यांनी नागपूर व नांदेड येथे यापूर्वी आयोजित करण्यात आलेले शहीदी समागम यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती देत, त्याच धर्तीवर नवी मुंबईतील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासन, प्रशासन आणि आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे मुख्य समागमाचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमास देशभरातून मोठ्या संख्येने भाविक, संत-महंत, धार्मिक नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाच्या तयारीची माहिती देताना सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिका, रायगड जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सेवा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षा, निवास व अन्य मूलभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम सुरू केले असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी नागपूर आणि नांदेड येथे आयोजित करण्यात आलेले शहीदी समागम नियोजनबद्ध आणि शांततेत पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील समागमही भव्य, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या महान बलिदानाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून सामाजिक ऐक्य, सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

संबंधित पोस्ट

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा..

vishwatmaklokswamivarta

प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन👉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड मधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार, नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त.

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर- राज्यातील 07 सागरी जिल्ह्यातील 09 ठिकाणी पहिल्या ड्रोन प्रणालीचे उड्डाण..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन

परीक्षा केंद्राला जिल्हाधिकारी यांची अचानक भेट दहावी व बारावी परीक्षामधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta