vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान

नांदेड प्रतिनिधी :- आगामी काळात संपुर्ण नांदेड जिल्ह्यात 14 एप्रिल 2026 रोजी आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी करण्यात येते. त्यामुळे 14 एप्रिल 2026 रोजी तसेच त्यानंतर 15 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीतसुद्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुका व इतर कार्यक्रमांचे आयोजन करुन साजरी करण्यात येत असते. त्याअनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जिल्ह्यात शांतता टिकुन राहावी म्हणुन नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 1951 प्रमाणे प्रदान झालेल्या अधिकारान्वे पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केला आहे.

12 एप्रिल 2026 चे 00:01 वाजता पासून ते 1 मे 2026 चे 24:00 वाजता पर्यत नांदेड जिल्ह्यातील सर्व पो.स्टे. स्वाधिन अधिकारी त्यांच्या अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 मधील पोट कलम “अ” ते “ई” प्रमाणे पुढील लेखी किंवा तोंडी आदेश आपआपल्या हद्दीत देण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे.

रस्त्यावरील व रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कोणत्या रितीने चालावे कोणत्या रितीने वागावे ते फर्माविण्यासाठी. अशा कोणत्याही मिरवणुकांना कोणत्या मार्गाने आणि कोणत्या वेळी जावे किंवा जाऊ नये हे ठरविण्याबद्दल. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चनेच्या प्रार्थना स्थळांच्या सर्व जागेच्या आसपास पुजे-अर्चेनेच्या वेळी कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळे होण्याचा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होण्याचा संबध असेल अशा सर्व बाबतीत अडथळा होऊ न देण्याबाबत.सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानाच्या कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेमध्ये व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरेचे नियमन करण्याबद्दल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33, 35 ते 40, 42, 43, 45 या अन्वये नमुद केलेल्या कोणत्याही हुकूमापेक्षा कमी दर्जाचे व त्यापुष्टी देणारे दुय्यम अधिकाऱ्यांना जबाबदारीवर हुकूम करण्याचा मार्गदर्शन पर आदेश देण्याबाबत. तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाणी ध्वनीक्षेपण आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सूचना देण्यासंबंधी.

कोणीही सदरचा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यात जाहिर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबधीत पोलीस फौजदार किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ, सभेची जागा मिरवणुकीचा व मोर्चाचा मार्ग, त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नयेत. तसेच संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेले आदेशांचे पालन करावे. सदर जाहिर सभा, मिरवणुक पदयात्रा, समायोचीत घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बांधा येवु शकतो अशा घोषणा देऊ नयेत.

सदरचा आदेश लग्नाच्या वरातीस, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास तो महाराष्ट्र पोलीस कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल. सदरचा आदेश दिनांक 12 एप्रिल 2026 चे 00:01 वाजेपासून ते 1 मे 2026 रोजीचे 24:00 वाजेपर्यंत लागु राहिल. हा आदेश नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी 10 एप्रिल 2026 रोजी निर्गमीत केला आहे.

00000

संबंधित पोस्ट

महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिक-केंद्रित सेवा आणि योजनांचा प्रचार करण्यासाठी एक विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर ! अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे  पंचनाम्याचे चावडी वाचन करा

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta