vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई द प्रतिनिधी – रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे शहर जिल्हा युवक कमिटीचे सरचिटणीस अशोक कांबळे यांच्यावरती जीवघेणा हल्ला करुन त्यांचा झालेल्या हत्येचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तिव्र निषेध करीत आहोत. दिवंगत अशोक कांबळे यांच्या मारेक-यांना त्वरीत अटक करुन कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.  ना. रामदास आठवले हे दिवंगत रिपब्लिकन कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या कुटुंबियांची लवकरच सांत्वनपर भेट घेणार आहेत. रिपब्लिकन वतीने दिवंगत अशोक कांबळे यांना जाहीर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

 दिवंगत अशोक कांबळे रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर जिल्हयातील युवा कार्यकर्ते होते. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमात भाग घेतला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे आयोजन ते करीत होते. राम नगर ठाणे येथे त्यांच्या कामाचे कार्य होते. रिपब्लिकन कार्यकर्ता म्हणून त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्यावर अचानक भ्याड हल्ला करुन त्यांची हत्या झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि मनाला वेदना देणारी आहे. त्यांच्या झालेल्या हत्येचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध करीत आहोत. तरी प्रशासनाने सर्व मारेक-यांना त्वरीत अटक करुन गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

00000

संबंधित पोस्ट

आर्थिक उन्नतीसाठी हिंदु खाटीक समाजासाठी महामंडळाच्या विविध योजना;अर्ज सादर करण्याचे आवाहन

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन

चिखली तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींसाठी सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

ऑनलाईन बुकिंग पोर्टल्सवर शहरांची नावे अद्ययावत करणे आणि प्रतिबंधित नायलॉन मांजा वाहतूक बंदीबाबत विशेष बैठकीचे आयोजन