vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी२० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी२० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सन २०२५ च्या पुरस्कारासाठी पात्र खेळाडूंनी ३० जुलै ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करावे, असे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सायली जाधव यांनी केले आहे.

जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. तसेच साहसी क्षेत्रातील आजीवन योगदानासाठी स्वतंत्र पुरस्कारही प्रदान करण्यात येतो.

सन २०२५ च्या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येणाऱ्या खेळाडूंची कामगिरी सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांतील असणे आवश्यक आहे. संबंधित साहसी उपक्रम हे जमीन, पाणी किंवा हवाई क्षेत्रातील असावेत तसेच खेळाडूची कामगिरी अतिउत्कृष्ट स्वरूपाची असणे आवश्यक आहे.

पुरस्कारासाठीची नामांकने केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या ऑनलाइन पोर्टलवरच स्वीकारली जाणार असून, मंत्रालयाकडे ऑफलाइन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जांची कोणतीही दखल घेतली जाणार नाही व ते थेट नाकारण्यात येतील, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मराठवाडा पर्यावरण बटालियनमध्ये माजी सैनिक व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळावा

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

एम्समधील नॅट केंद्राचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जागृती योजनेंतर्गत मिरजेत 11 जुलैला कायदेविषयक शिबीर

नियुक्त उमेदवारांनी शासनाचा व जनतेचा विश्वास संपादन करावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यात अनुकंपा व लिपिक भरती नियुक्तीच्या 139 आदेशांचे वितरण- शासकीय संस्थांच्या बळकटीकरणाला गती देऊ 

भाजपा जिल्हा कार्यालयात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व लोकनेते रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती मंगलमय वातावरणात संपन्न

vishwatmaklokswamivarta