vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

अकोला, प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याकरिता निश्चित करण्यात आलेली मुदत संपलेली आहे. तथापि, काही माध्यमे व समाजमाध्यमांवर संबंधित मुदत वाढविण्यात आल्याबाबत काही चुकीच्या व भ्रामक बातम्या प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सदर प्रसारित होत असलेल्या बातम्या या वस्तुस्थितीला धरून नाहीत व त्या पूर्णपणे अफवा आहेत. अशा प्रकारच्या अप्रमाणित बातम्या तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ अधिकृत स्त्रोतांवरून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी यांनी केले.

 ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्र सादर करु न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्हयांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आल्याची चुकीची बातमी लाडक्या बहिणींना अखेरची संधी या मथळ्याखाली एका वृत्तवाहिनीवर व एका वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याबाबत आवाहन शासन स्तरावरुन करण्यात आलेले नाही. चुकीच्या बातम्यांमुळे योजनेचा लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत असुन त्यामुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शहर व तालुका स्तर कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

सदर वस्तुस्थिती लक्षात घेता अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व लाभार्थी यांनी संयम ठेवावा असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय बालिका दिवस विशेष अमरावती डाक विभागाची ‘सुकन्या समृध्दी खाते’ मोहिम “नन्ही मुस्कान, बडी उडान”

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये*जिल्हाधिकारी संतोष पाटील*

दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ;बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहे आढळुन आल्यास शासनास कळविण्याचे आवाहन