vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

 

अकोला, द प्रतिनिधी अकोला येथे विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून अकोला कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने सखोल तपासणी करून संबंधित ठिकाणी छापा मारला व ९२ लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त केला. कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीशकुमार दांडगे, कृषी अधिकारी (गु. नि.) सुधाकर खंडारे, कृषी अधिकारी रोहिणी मोघाड, पंकज जगताप, पंकज झरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फिर्यादी कृषी गुणनियंत्रण अधिकारी यांच्या तक्रारीवरून अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्यात कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत एकूण 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक ( 3827 लिटर व 31 हजार 141 किलो ) असा एकूण 92 लक्ष 5 हजार 500 रू. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 व खत नियंत्रण आदेश 1985 नुसार ही कारवाई करण्यात आली.

  जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, संचालक (निवगुनि) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ मुरली इंगळे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, कृषी अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पूर्ण झाली. पोलीस अधिकारी (आयपीएस) ईशा आनंद यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

०००

संबंधित पोस्ट

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढला; कमाल तापमानाचा पारा ४३.६ अंशांवरविदर्भात अमरावती आणि वर्धा सर्वाधिक उष्ण; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन   

जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सव भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्या– जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश;बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे – 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta