vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन   

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन

                                          सांगली, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तळमजला, विजयनगर, सांगली येथे शुक्रवार, दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्ह (भरती मेळाव्याचे) आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

  या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 85 पेक्षा अधिक पदांकरिता जिल्ह्यातील सह्याद्री मोटर्स, प्रा.लि.सांगली, मास इंजिनिअर्स, सांगली, कलापी इंजि.असो.प्रा.‍लि.सांगली, घाटगे पाटील ॲटो ॲन्ड फर्म मेकॅनायझेशन, सांगली इत्यादी नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि जिल्ह्यातील रोजगार इच्छुक उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये उपस्थित उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली, दुरध्वनी क्रमांक – 02332990383 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील 

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे- वनमंत्री गणेश नाईक

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत

डॉ. संपदा मुंडे प्रकरणात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश,सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा; पोलीस अधीक्षक कार्यालयाने चार्जशीट वेळेत दाखल करावे

vishwatmaklokswamivarta

गावे हरित करण्याचा संकल्प; पर्यावरण दिनापासून प्रत्येक गावात वृक्ष लागवड..

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात  संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

vishwatmaklokswamivarta