vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेशस्थानिक बातम्या

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

जालना | प्रतिनिधी – भारतीय आर्ट्स अँड स्पोर्ट्स यूथ गेम असोसिएशनच्या वतीने उत्तर प्रदेशातील नोएडा इंडोर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय यूथ गेम कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत जालना जिल्ह्याच्या कराटेपटूंनी दैदिप्यमान कामगिरी करत महाराष्ट्रासह जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. देशभरातील विविध राज्यांतील शेकडो कराटेपटूंमध्ये जालन्याच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर ११ सुवर्ण, ५ रौप्य आणि ७ कांस्य अशी एकूण २३ पदके पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.

सेन्साई रुपेंद्र गोपाल पारचा यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत त्यांनी प्रभावी कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. खेळाडूंच्या या यशामुळे जालना जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत जालन्याच्या खेळाडूंनी आत्मविश्वासपूर्ण खेळ करत अनेक गटांमध्ये पदके पटकावली.

काता प्रकारातील पदक विजेतेसुवर्णपदक विजेते : निवांशी वलकट्टी, अनुष्का म्हेत्रे, तन्वी खरटमल, आरुषी वलकट्टी, वैष्णवी लुटे, पूर्वा माने, लावण्या गुडला, ऋषिकेश श्रीराम, ओमकार गुट्टे, शेलमॉन गुडेकर आणि नयन गोमतीवाले.रौप्यपदक विजेते : वैष्णवी लोखंडे, दिव्यता कोठारी आणि आकांक्षा चिल्का.कांस्यपदक विजेता : यशवर्धन चिल्का.

कुमिते प्रकारातील पदक विजेते,रौप्यपदक विजेते : निवांशी वलकट्टी आणि लावण्या गुडला.कांस्यपदक विजेते : वैष्णवी लोखंडे, दिव्यता कोठारी, आकांक्षा चिल्का, वैष्णवी लुटे, ऋषिकेश श्रीराम आणि नयन गोमतीवाले.

जालन्यात विजेत्यांचे जल्लोषात स्वागत,

राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवून जालना येथे परतलेल्या खेळाडूंचे शहरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आयोजित सत्कार समारंभात महापौर वंदनाताई मगरे आणि नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व पदक विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.यावेळी राज स्वामी, सखुबाई पनबिसरे, सेन्साई रुपेंद्र गोपाल पारचा, स्टेअर्स जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, उपाध्यक्ष गणेश श्रीराम, उपाध्यक्ष प्रशांत प्रेम भरती, नवीन कुमार वलकट्टी, सचिन लुटे, गणेश चिप्पा, सुजित माने, राजपाल पारचा, किशोर गुडला, भगवान म्हेत्रे यांच्या सह कराटेप्रेमी, पालक, प्रशिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे जालना जिल्ह्याचा गौरव वाढल्याचे त्यांनी सांगितले.

खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे – अक्षय गोरंट्याल,राष्ट्रीय यूथ गेम कराटे चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय यश मिळवून जालना जिल्ह्याचा गौरव वाढविणाऱ्या सर्व कराटेपटूंचे नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी बोलताना त्यांनी, “राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. याच जिद्दीने आणि मेहनतीने जालना जिल्ह्यातील खेळाडूंनी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी करून देशासह जालना जिल्ह्याचे नाव जगभर उज्ज्वल करावे,” अशा शुभेच्छा दिल्या. तसेच खेळाडूंना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या प्रोत्साहनासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शहरातून विजयी रॅली ,सत्कारानंतर विजेत्या खेळाडूंची भव्य विजयी रॅली काढण्यात आली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होऊन नारायण स्कूल, भीमनगर, रामनगर, वाल्मिकी नगर मार्गे वाल्मिकी मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात खेळाडूंचे स्वागत केले. परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

जालना जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी यश,कराटेपटूंनी मिळविलेले हे यश जालना जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासातील अभिमानास्पद मानले जात आहे. सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. भविष्यात राष्ट्रीयबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही जालना जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार खेळाडूंनी व्यक्त केला.या उल्लेखनीय यशामुळे जालना जिल्ह्यातील कराटे क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, अधिकाधिक युवक-युवतींनी कराटेकडे वळावे, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांनी व्यक्त केली. जालना जिल्ह्याच्या या सुवर्ण यशामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटत आहे.

चौकट : पावसाच्या सरींनी केले विजेत्यांचे स्वागत!राष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून जालना येथे परतलेल्या खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यावेळी निसर्गानेही आनंदोत्सवात सहभाग नोंदवला. सत्कार सुरू असतानाच पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि उपस्थितांनी त्याला विजेत्यांवरील निसर्गाच्या शुभाशीर्वादाची उपमा दिली. पावसाच्या साक्षीने झालेला हा सत्कार आणि त्यानंतरची विजयी रॅली खेळाडूंसाठी अविस्मरणीय ठरली. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात खेळाडूंचे स्वागत करून त्यांच्या यशाचा आनंद द्विगुणित केला.

 

 

संबंधित पोस्ट

शिवशंभो चौक ते कर्नाळ पोलीस चौकी रस्ता सुधारणा कामासाठी 30 जुलैपर्यंत वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

6 एप्रिल रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

ग्रीनलँड-इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी…

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक ! वसई होली फॅमिली शाळेत येशू चमत्कारांचे नाट्य!-अंधश्रद्धा पसरवून धर्मांतर षड्यंत्र – जादूटोणा कायद्याने गुन्हा नोंदवा– हिंदु जनजागृती समितीची मागणी

11वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि.21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार साजरा

vishwatmaklokswamivarta