vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

लिपिकांसाठी १५ एप्रिलपासून ५० दिवसांचे लेखाविषयक प्रशिक्षण

लिपिकांसाठी १५ एप्रिलपासून ५० दिवसांचे लेखाविषयक प्रशिक्षण

 

​अहिल्यानगर प्रतिनिधी- जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील गट-क लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी १५ एप्रिल ते २५ जून २०२६ या कालावधीत ५० दिवसांचे महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी ७ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी जनार्दन सहारे यांनी केले आहे.

नाशिक येथील लेखा व कोषागारे विभागाचे विभागीय सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणात लेखा, वित्त व शासनाच्या विविध संगणक प्रणालींची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील नवनियुक्त व इच्छुक लिपिकांना या प्रशिक्षणासाठी आवर्जून पाठवावे.

प्रशिक्षणासाठीचे आवेदनपत्र संबंधित कार्यालय प्रमुखांच्या शिफारसपत्रासह १ ते ७ एप्रिल या काळात अहिल्यानगर येथील जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल किंवा पूर्ण वेळ उपस्थित राहणे शक्य नसल्यास एखाद्या विशिष्ट सत्रासाठीही प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली आहे. या प्रशिक्षणाचा सविस्तर अभ्यासक्रम माहितीसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

सिल्लोड येथे आज (दि.२६) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

एम-सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादित करण्यास इच्छुक व्यावसायिकांनी संगणक प्रणालीवर महाई-सेवा केंद्र किंवा वैयक्तीकरीत्या अर्ज करावेत..

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी-उपमुख्यमंत्री यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान- उपमुख्यमंत्री अजित पवार

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास 15 ऑगस्टपासून सुरू

Gadchiroli 🌍: इस्त्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी ✨कौशल्य विकास केंद्राचे तरुणांना आवाहन 🙌