vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशासन गाँव की ओर’ मोहीम प्रभावीपणे राबवावी  — जिल्हाधिकारी किशन जावळे 

प्रशासन गाँव की ओर’ मोहीम प्रभावीपणे राबवावी  — जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि.19 ते दि.25 डिसेंबर 2025 दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीम राबविण्यात येणार आहे. यासप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दृरदूश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.रविंद्र शेळके, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.जावळे यांनी सांगितले की या ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आराखडा तयार करावा. आपले सरकार पोर्टलवर प्रलंबित तक्रारींचा निपटारा करुन घ्यावा. केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी. या मोहिमेदरम्यान विभागांनी अभिनव उपक्रम राबवावेत तसेच या मोहिमेला विशेष प्राधान्य देवून नियोजन करावे, असे निर्देश श्री.जावळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. याच अनुषंगाने 23 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा नियोजन भवन अलिबाग येथे जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक विभागांना वर्षभरात राबविलेल्या विशेष उपक्रमांवर सादरीकरण करावे अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या.

या बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच इतर शासकीय विभागांचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

००००००

संबंधित पोस्ट

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप २०२६ साठी कृषी विभागाचे आवाहन

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही…

वैष्णवी मृत्यू प्रकरण- गृहविभागाची सर्वात मोठी कारवाई- आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर पदभार काढून घेतला

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

आदि कर्मयोगी अभियानांतर्गत ब्लॉक मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाला सुरुवात*

vishwatmaklokswamivarta

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

vishwatmaklokswamivarta