vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

जिल्ह्यात 18 जानेवारीपर्यंत मनाई आदेश

 

रायगड- प्रतिनिधी:- महानगरपालिका निवडणूक सन 2025 या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून दि.15 डिसेंबर 2025 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमधील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये दि.15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून दि.16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सामाजिक तेढ निर्माण होवू नये याकरीता पोलीस आयुक्त नवी मुंबई मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील निवडणूक कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 (1) (प) अन्वये या आदेशाच्या तारखेपासून नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील पोलीस ठाणे हद्दीमध्ये ही निवडणूक प्रकिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे

विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे, कमान, पताका, कट आउट लावणे किंवा चिन्हे वापरतात, त्यामुळे अनेक वेळा दोऱ्या, काठ्या व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येऊन रहदारीस अडथळा होतो. प्रचाराचे कालावधीत अशा किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन पक्ष कार्यकर्त्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ शकतो.

  कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल अशा रितीने बॅनर्स, फलक, पोस्टर्स, कटआउट्स, खांबावर झेंडे, बोर्ड व बॅनर्स लावता येणार नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत, कंपाऊंड अथवा आवारात पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, कटआउट्स, कापडी फलक लावणे, नोटीसा चिटकविणे, घोषणा लिहिणे इत्यादीचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशा लेखी परवानगीची छायांकीत प्रत स्थानिक पोलीस स्टेशन व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना 3 दिवसाचे आत देण्यात यावी. अशारितीने खाजगी जागेवर लावलेले पोस्टर्स, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक इत्यादींमुळे रहदारीस अडथळा होणार नाही, उजेड व हवा अडवली जाणार नाही हे पाहणे त्या उमेदवाराला बंधनकारक राहील.

नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी सदरहू आदेशाच्या प्रती त्यांच्या हद्दीमध्ये सहज दिसणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी चिकटवून तसेच ध्वनीक्षेपकाव्दारे प्रक्षेपीत करुन जाहीर कराव्या व त्याप्रमाणे पोलीस ठाणे दैनंदिनीमध्ये नोंदी घ्याव्यात. हा आदेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि.15 डिसेंबर 2025 रोजी 17.00 वा. पासून ते दि.18 जानेवारी 2026 रोजीचे 24.00 वा.पर्यंत अंमलात राहील. या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 131 प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

000000

संबंधित पोस्ट

लातूर येथे राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ ला प्रारंभ

ज्येष्ठ नागरीकांच्या आनंददायी जिवनासाठी ज्येष्ठ,नागरिक मालमत्ता हक्काबाबत उपक्रम राबविणार

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड जिल्हा तालुकानिहाय पर्जन्यमान🗓️ दिनांक: 01.07.2025 (आज 8 वाजेपर्यंत)

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला साजेशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये १५ ते १९ दरम्यान स्पर्धेचे आयोजन

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत महानगरपालिका स्तरावरअर्ज स्विकारण्यास 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ