vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पर्यावरणपुरक गणेश विसजर्नाचा कोंढवली गावाने घालून दिला आदर्श..

पर्यावरणपुरक गणेश विसजर्नाचा कोंढवली गावाने घालून दिला आदर्श..

सातारा प्रतिनिधी राज्य शासनाकडून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवाहन केले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असून कोंढवली ता. सातारा या गावाने या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर गावांना आदर्श घालून दिला आहे. कोंढवली गावच्या घरगुती गणेश विसर्जनाच्या मुर्ती लिंब गावच्या नदीपात्रात विसर्जित करण्यात येतात. बऱ्याच गणेशमुर्ती पीओपीच्या असल्याने कोंढवलीकरांनी नदी प्रदुषण टाळण्यासाठी विसर्जनाच्या मुर्ती विधीवत पूजा करुन लिंब ग्रामपंचायत प्रशासनाकडे सूपूर्द केल्या. जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी कोंढवली गावात जाऊन पर्यावरणपूरक विसर्जन करण्याविषयी प्रबोधन केले. याला प्रतिसाद देऊन कोंढवली ग्रामस्थांनी विसर्जनाच्या मुर्ती लिंब ग्रामपंचायत प्रशासनाकडे सूपूर्त केल्या.

लिंब गावचे येत्या शनिवारी विसर्जन असून पर्यावरणपूरक विसर्जन करण्सासाठी लिंब गावच्या गणेश मंडळांची व प्रतिष्ठीत नागरीकांची बैठक घेऊन गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार करुन गावात याविषयी गावात प्रबोधन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी लिंब ग्रामपंचायतीचे प्रशासक विस्तार अधिकारी श्री. जाधव, लिंब गावचे ग्राम विकास अधिकारी श्री. चव्हाण, जिल्हा माहिती कार्यालयातील वैभव जाधव व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

0000

*

संबंधित पोस्ट

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

गडचिरोलीत कबड्डीचा थरार! वीर बाबुराव शेडमाके स्पर्धेत ‘जय सेवा कबड्डी संघ, सोडे’चा विजय..

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा विभागस्तरीय ७० व्या कामगार नाट्य स्पर्धा-प्राथमिक फेरीचे पारितोषिक वितरण उद्या(दि.१५)

vishwatmaklokswamivarta

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारामधील अनियमितता राष्ट्रीय बांध सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासले जाईल,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांची भेट..

vishwatmaklokswamivarta

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम – मंत्री प्रताप सरनाईक स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प; एसटीचा ७८ वा वर्धापन दिन