vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन…

राज्य प्रतिनिधी-नवी दिल्ली, : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र सदन येथे श्री गणेशाचे दर्शन घेतले. निवास आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वयं सहायता गटांनी तयार केलेल्या पारंपरिक शालीने स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या, “गेल्या २७-२८ वर्षांपासून महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा होत आहे. हा उत्सव आपली संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा दर्शवतो. दिल्लीत गणपतीचे दर्शन घेण्याचा आनंद मिळाला. स्वयं सहायता गटांच्या स्टॉल्सना येथे उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे, ही अभिमानाची बाब आहे.”

बल्गेरियाचे भारतातील राजदूत निकोलाय यान्कोव यांनी घेतले ‘श्री गणेशा’चे दर्शन बल्गेरियाचे भारतातील राजदूत निकोलाय यान्कोव यांनीही श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत शिष्टमंडळ उपस्थित होते. निवास आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले. राजदूतांनी स्वयं सहायता गटाच्या प्रदर्शनाला भेट देऊन हस्तकला वस्तूंची पाहणी केली आणि खरेदीही केली. “ हा भारतीय संस्कृतीचा अनोखा उत्सव आहे. हा उपक्रम स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन देणारा आहे,” असे यान्कोव म्हणाले. ही भेट भारत-बल्गेरिया सांस्कृतिक संबंध दृढ करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी गायक नितीन सरकटे यांचा हिंदी-मराठी भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला. उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवाने देश-विदेशातील मान्यवरांचे लक्ष वेधले असून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे.

संबंधित पोस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात निर्बंध लागू

विद्यार्थी स्कूल व्हॅनला राज्य शासनाची मंजुरी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थी सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगाराची संधी..

बीजोत्पादनातून महिला सक्षमीकरणाचा ‘जालना पॅटर्न’

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – माण-खटाव तालुकास्तरीय कार्यशाळेचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोससाठी रवाना महाराष्ट्राचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेत सहभाग

vishwatmaklokswamivarta

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta