vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

जालना, प्रतिनिधी : सन 2024-25 यावर्षीपासून इयत्ता 10 वी व 12 वी च्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील जिल्हा/विभाग/ राज्य/ राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील पात्रता धारक खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणाचे अर्ज जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार पोर्टलवरती ऑनलाईनद्वारे भरावयाचा आहे. जालना जिल्ह्यातील कोणत्याही खेळाडूचा ग्रेस गुणाचा अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून ऑफलाईन पध्दतीने स्वीकारला जाणार नाही.

आपले सरकार पोर्टवरीती ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यापासून खेळाडू विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान भरपाईस सदर मुख्याध्यापक/प्राचार्य जबाबदार राहतील यांची गांभीर्याने नोंद घ्यावी.

त्यानुसार जिल्ह्यातील सदर मुख्याध्यापक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील खेळाडू विद्यार्थ्यांनी दि. 31 मार्च 2025 पर्यंत आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईनवर ग्रेस गुणाचे अर्ज करण्यात यावे असे आवाहन संजय गाढवे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

***

संबंधित पोस्ट

पावसाळी पूर व्यवस्थापनासाठी आंतरराज्यीय समन्वय बैठक संपन्न, संभाव्य पूर नियंत्रणासाठी समन्वय आणि प्रभावी नियोजनाचा निर्णय..

राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘कलागणेश महोत्सव’ रसिकांच्या गर्दीत जल्लोषात साजरा..

vishwatmaklokswamivarta

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026जिल्ह्यात एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी- मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के इतके मतदान …

vishwatmaklokswamivarta

सुषमा स्वराज या अष्टपैलू प्रतिभावंत राजकारणी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार, हवामान विभागाचा इशारा